आयुष्याची वैधता
आयुष्याची वैधता.
आयुष्य हे फसवे फुलपाखरू 🦋 आहे. आपल्याला वाटते तितके आपण आपल्या मनाने नाही जगू शकत. आपण सर्व गोष्टीवर प्रभुत्व मिळवू शकतो पण आयुष्य जगण्यावर नाही. आनंद उपभोगत राहिले तणाव मुक्त राहिले की ते वाढते, आणि तणावाने ते कमी होते. चिंतेने आपल्या शरीरात अनेक रोग जडु लागतात. मग सुरू होतो तो दवाखाना. असं म्हणतात शहाण्याने कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी कधीच चढु नये. या साठी आपण आपली तब्येत सांभाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे घेतली पाहिजे. काही लोक नैसर्गिक संकटांना बळी पडतात. म्हणून आयुष्य क्षणभंगुर आहे ते फसवते आपल्याला.
आजकाल विश्वास नाही राहीला कोणावर प्रत्येक जन पैसा कमावण्याच्या शर्यतीत धावतो आहे. सर्वांना मागे टाकून स्वतः पुढे जाण्यासाठी. मग आपण कोणत्या गोष्टींची किती काळजी करावी किती ताण घ्यावा हे आपण आपल्या मनाला ठरवु द्यावं. त्या साठी शर्यतीत पळणारया डॉक्टरांनी ठरवायला नको.
लोक विचारतात तुमचे घरचे तुम्हाला खुश ठेवतात का ? अरे पण शरीर आपलं मन आपलं त्याच्यावर आपलं स्वतःचं नियंत्रण स्वतः ठेवायचं असतं. कधी खुष व्हायचं कधी नाही व्हायचं ते आपल्या मनाला ठरवु द्यावं ना कि घरच्यांना. किंवा दुसऱ्या कुणाला. बघा किती तंदुरुस्त होता येत आपल्याला. ठरवलं तर सर्व काही बरोबरच होतं. मग आधी ठरवा.
काही गोष्टी आपण समाजाच्या भितीने करायचे टाळतो. काही गोष्टी आपल्या संस्कृतीत बसत नाही म्हणून टाळतो, आणि काही गोष्टी आपल्या तत्वात बसत नाही म्हणून आपण टाळतो. म्हणजे उदा.काही अघटीत प्रसंग पाहीले कि लोक सगळ्यात आधी दुःखी होतात अरे तो क्षण समोरच्या माणसाला सावरण्याचा असतो त्याला धीर देण्याचा असतो. पण नाही आपण पहिले कष्टी होऊन बसतो. अरे नयुटरल रहा. आपल्याला पण देवाने या पृथ्वीतलावर एकदाच पाठवले आहे. आणि परत घेऊन तो कधी ना कधी जाणारच मग सुरू असलेले रहाटगाडगे चिंतामुक्त जगुन आपल्या आयुष्याची वैधता आपण वाढवूयात नाही का ?
लोक दुसर्याची काॅपी करत असतात. आपल्याला देवाने आपले वेगळे मन दिले आहे हे विसरून जातात आणि न पटणारया गोष्टी आपण घडु देत असतो. याच सगळ्या गोष्टीत स्वच्छंदी फुलपाखरू घुसमटत जाते ते होऊ देऊ नये. म्हणून आनंदाने जगा, आणि दुसरयांनाही आनंदाने जगु द्या.
धनवंती मोरे
☺

Comments
Post a Comment