Posts

Showing posts from April, 2024

आयुष्याची वैधता

Image
 आयुष्याची वैधता. आयुष्य हे फसवे फुलपाखरू 🦋 आहे. आपल्याला वाटते तितके आपण आपल्या मनाने नाही जगू शकत. आपण सर्व गोष्टीवर प्रभुत्व मिळवू शकतो पण आयुष्य जगण्यावर नाही. आनंद उपभोगत राहिले तणाव मुक्त राहिले की ते वाढते, आणि तणावाने ते कमी होते. चिंतेने आपल्या शरीरात अनेक रोग जडु लागतात. मग सुरू होतो तो दवाखाना. असं म्हणतात शहाण्याने कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी कधीच चढु नये. या साठी आपण आपली तब्येत सांभाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे घेतली पाहिजे. काही लोक नैसर्गिक संकटांना बळी पडतात. म्हणून आयुष्य क्षणभंगुर आहे ते फसवते आपल्याला. आजकाल विश्वास नाही राहीला कोणावर प्रत्येक जन पैसा कमावण्याच्या शर्यतीत धावतो आहे. सर्वांना मागे टाकून स्वतः पुढे जाण्यासाठी. मग आपण कोणत्या गोष्टींची किती काळजी करावी किती ताण घ्यावा हे आपण आपल्या मनाला ठरवु द्यावं. त्या साठी शर्यतीत पळणारया डॉक्टरांनी ठरवायला नको. लोक विचारतात तुमचे घरचे तुम्हाला खुश ठेवतात का ? अरे पण शरीर आपलं मन आपलं त्याच्यावर आपलं स्वतःचं नियंत्रण स्वतः ठेवायचं असतं. कधी खुष व्हायचं कधी नाही व्हायचं ते आपल्या मनाला ठरवु द्यावं ना कि घरच्य...

शिक्षणाचा खडतर प्रवास

 छोट्या एका सुंदर गावी जन्म झाला. सरकारी मराठी शाळा, गावातील वडिलांचे कपड्यांचे एकुलते एक दुकान. बाबा नाराजच होते कन्या रत्न झाले म्हणून पण आई खूप खुश होती वेण्या घालण्याची स्वप्न पाहिले होतेना तिने, तिच्या मनासारखं झाले होते. दिवस छान होते ते आई घर आवरून दुकानात मदतीला जात असे. मी तशी छान छोकीत वाढलेली दोन भाऊ आणि मी एकटी. त्यामुळे खूप लाड. पण अभ्यास आवडती गोष्ट. नंबर आल्यावर लोक जी प्रशंसा करतात ना ते फार भारी वाटायचं मला.   सातवी इयत्ता नंतर पुढच्या शिक्षणासाठी दुसरीकडे जाव लागले. पुढे शिकत गेले, गाव मागे सुटत राहिली. वय वाढत तसतसे काही तरी आपल्याला साध्य करायचे आहे गावातुन शिक्षीत व्हायचे आहे असे वाटत होते. आठवी नंतर वर्गातील एक एक मलगी कमी होऊ लागली. कोणाचे लग्न झाले. आणि मधून शाळा सोडली. एवढ्या मुलांमध्ये वर्गात मुलगी म्हणून एकटीच राहिले. परंतु कोणतीच भीती न बाळगता मी दहावी पूर्ण करून पुढे शिकण्याचे ठरवले होते. खूप अभ्यास केला  मैत्रिणी नाही कोणताच प्रॉब्लेम डिस्कस करण्यासाठी. आणि अख्या भागात दहावी पास होणारी पहीली मुलगी झाले. पुढच्या शिक्षणासाठी कुठे पाठवावे आ...