शिक्षणाचा खडतर प्रवास
छोट्या एका सुंदर गावी जन्म झाला. सरकारी मराठी शाळा, गावातील वडिलांचे कपड्यांचे एकुलते एक दुकान. बाबा नाराजच होते कन्या रत्न झाले म्हणून पण आई खूप खुश होती वेण्या घालण्याची स्वप्न पाहिले होतेना तिने, तिच्या मनासारखं झाले होते. दिवस छान होते ते आई घर आवरून दुकानात मदतीला जात असे. मी तशी छान छोकीत वाढलेली दोन भाऊ आणि मी एकटी. त्यामुळे खूप लाड. पण अभ्यास आवडती गोष्ट. नंबर आल्यावर लोक जी प्रशंसा करतात ना ते फार भारी वाटायचं मला.
सातवी इयत्ता नंतर पुढच्या शिक्षणासाठी दुसरीकडे जाव लागले. पुढे शिकत गेले, गाव मागे सुटत राहिली. वय वाढत तसतसे काही तरी आपल्याला साध्य करायचे आहे गावातुन शिक्षीत व्हायचे आहे असे वाटत होते. आठवी नंतर वर्गातील एक एक मलगी कमी होऊ लागली. कोणाचे लग्न झाले. आणि मधून शाळा सोडली. एवढ्या मुलांमध्ये वर्गात मुलगी म्हणून एकटीच राहिले. परंतु कोणतीच भीती न बाळगता मी दहावी पूर्ण करून पुढे शिकण्याचे ठरवले होते. खूप अभ्यास केला मैत्रिणी नाही कोणताच प्रॉब्लेम डिस्कस करण्यासाठी. आणि अख्या भागात दहावी पास होणारी पहीली मुलगी झाले. पुढच्या शिक्षणासाठी कुठे पाठवावे आणि कसे पाठवावे हा घरच्यांच्या समोरचा मोठा प्रश्न वडिलांनी जवळजवळ शिक्षण बंद करण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. काय बोलत होते शहरामध्ये एकटी मुलगी कशी राहणार कशी स्वतःचा सांभाळ करणार. पण मी हट्टी असल्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना सांगुन टाकले. पण कोणी काहीच हालचाल करत नव्हते.
एक दिवस समजले मावशी पुण्याला आपल्या मुलीकडे जाणार आहे. मी तिच्याबरोबर गुपचूप छोटी बॅग भरून पुण्याला आले. मावशीने दाजींना सांगितले आता हिचे ऍडमिशन घ्या आणि इथेच शिकण्यासाठी ठेवा. माझं नशीब बलवत्तर होतं म्हणून खूप प्रयत्न केले व एडमीशन घेतले. मी मोकळा श्वास सोडला. जणू मावशी ने मला पंख लावून दिले. म्हणून आई नंतर मावशी आपली आई असते. पुस्तकांना आणि दोन ड्रेस साठी थोडेसे पैसे देऊन मावशी गावी निघून गेली. नवीन जीन्दगी नवीन जग मावशी मुळे पाहता आले. धाडस करा सगळे प्रश्न आपोआप सुटतात. खूप आभार मावशी... क्रमांश
धनवंती मोरे
पुढे लिहीण्याची प्रेरणा दया 🙏
ReplyDelete